राष्ट्रवादीचा ‘या’ माजी आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू, राजकीय क्षेत्रात खळबळ

[ad_1]

सोलापूर | देशात कोरोनाने हातपाय पसरले असताना कोरोनाबाबतचे दररोज नवनवे आकडे समोर येत आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना मृत्यूचं प्रमाण देखील वाढलं आहे. प्रशासन सेवेतल्या अधिकाऱ्यांना तसंच लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण होत आहे. अशातच एक दुख:द बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार युनूस शेख यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

13 जून रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. सोलापूरातील एका खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारांना योग्य प्रतिसाद न दिल्याने त्यांचा अखेर मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण सोलापूरात एकच खळबळ माजली आहे.

सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एक खंदे समर्थक आणि पक्षाध्यक्ष शरद पवारांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून त्यांची सोलापुरात ओळख होती. सोलापुरात राष्ट्रवादी वाढण्यासाठी तसंच राष्ट्रवादी रूजण्यासाठी त्यांनी अतिशय चांगलं काम केलं होतं.

शरद पवार हे सोलापूरचे पालकमंत्री असताना त्यांनी युनूस शेख यांना सोलापुरच्या महापौरपदी संधी दिली होती. त्यांनी त्या संधीचं सोनं केलं होतं. शेख यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक चांगले निर्णय घेतले.

कोरोना व्हायरसची बाधा झालेल्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तसंच मृत्यू होणारांच्या संख्येत देखील भर पडत चालली आहे. ठाण्याच्या शिवसेनेच्या एका नगरसेवकाला देखील कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

दुसरीकडे राज्य सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण आणि आता धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सर्वप्रथम जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनावर मात केली. त्यापाठोपाठ चव्हाण यांनी देखील कोरोनाला पराभूत केलं. आता धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईतल्या एका खासजी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राजेश टोपेंकडून महाराष्ट्राला मोठी गूड न्यूज… वाचून तुम्हीही सुटकेचा निश्वास सोडाल!

“…तर सलून व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासन परवानगी देईल”

महत्वाच्या बातम्या-

‘माझं आयुष्य तुम्हाला घ्या’, बाळा नांदगावकरांची राज ठाकरेंसाठी खास फेसबुक पोस्ट

‘अशीच चमकत रहा, तू अशा लोकांपैकी एक…, पाहा आदित्य ठाकरेंनी दिशाला काय दिलाय रिप्लाय!

संजय राऊतांच्या राज ठाकरेंना ‘मनसे’ शुभेच्छा, म्हणाले…

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here