सुशांतच्या जाण्याने मला धक्का बसलाय; उद्धव ठाकरेंनी वाहिली आदरांजली

[ad_1]

मुंबई |   बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलंय. संपूर्ण कला सृष्टीला सुशांतच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सुशांत जाण्याने चित्रपट सृष्टीचं नुकसान झालं असल्याची प्रतिक्रिया देत शोक व्यक्त केला आहे.

सुशांत सिंग राजपूत गेला आहे हे वृत्त कळताच मला धक्का बसला आहे. परमेश्वर हे दु:ख सहन करण्याची शक्ती सुशांतच्या कुटुंबाला, नातेवाईकांना, मित्रांना आणि त्याच्या करोडो फॅन्सना देवो, अशी मी प्रार्थना करतो असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मुंबईतील राहत्या घरात त्याने गळफास घेत आपल्या जीवनाला पूर्ण विराम दिला. सुशांतच्या घरी नोकरी करणाऱ्या व्यक्तीने बांद्रा पोलिस स्थानकात याबाबतची माहिती दिली आहे. सुशांतच्या आत्महत्येपाठीमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये.

अवघ्या 34 व्या वर्षी त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. यावरून अनेक उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. गेले काही दिवस सुशांत प्रचंड मोठ्या टेन्शनमधून जात होता, असं कळतंय. तसंच त्यावर उपचार देखील सुरू होते. मात्र आज दुपारी त्याने गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे.

सुशांत सिंग हा आघाडीचा नायक म्हणून प्रसिद्ध होता. त्याने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही सिरीअलमधून केली होती. पवित्र रिश्ता ही त्याची मालिका चांगलीच गाजली होती आणि आजही तो घराघरात याच मालिकेमुळे ओळखला जातो.

भारताचा माजी कर्णधार एम.एस.धोनीच्या जीवनाची ओखळ करून देणारा चित्रपट एम.एस.धोनी… द अनटोल्ड स्टोरीमध्ये सुशांतच्या कामाचं खूपचं कौतुक झालं होतं. त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ गल्ला जमवला होता.

दरम्यान,  चित्रपटसृष्टीतल्या अनेक दिग्गज्जांना हा धक्का पचवणं कठीण झालं आहे. सुशांतच्या जाण्याने अनेकांनी शोक व्यक्त करत त्याच्याप्रति आदरांजली व्यक्त केली आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

राजेश टोपेंकडून महाराष्ट्राला मोठी गूड न्यूज… वाचून तुम्हीही सुटकेचा निश्वास सोडाल!

“…तर सलून व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासन परवानगी देईल”

महत्वाच्या बातम्या-

अभिनेता सुशांतसिंग राजपूतनं आत्महत्या करुन संपवलं जीवन, राहत्या घरी घेतली फाशी…!

राष्ट्रवादीचा ‘या’ माजी आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू, राजकीय क्षेत्रात खळबळ

‘माझं आयुष्य तुम्हाला घ्या’, बाळा नांदगावकरांची राज ठाकरेंसाठी खास फेसबुक पोस्ट



[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here