वयाच्या १२ व्या वर्षी आत्याचं भाच्यावर जडलं प्रेम, १८ वर्ष पूर्ण होताच पळून केलं लग्न

पटना (बिहार) : प्रेम आंधळे असते, अजब प्रेम की गजब कहानी हे केवळ वाक्यप्रचार नसून, प्रत्यक्ष जीवनातदेखील अशा घटना घडतांना दिसतात. याचा प्रत्यय आला तो बिहार राज्यातील पटना शहरात. येथील आत्याने भाच्याशी लग्न केल्याचं समोर आलं आहे.

पटना इथे राहणाऱ्या नात्याने आत्या असणाऱ्या मुलीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन भाच्याशी लग्न केलं. त्या दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम होतं, की वयाची १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांनी वाट पाहिली, जेणेकरुन ते लग्न करू शकतील. मंगळवारी नात्याने आत्या आणि भाचा असलेल्या दोघांनी एका मंदिरात लग्न केलं. या लग्नाची मोठी चर्चा असून आत्या असणाऱ्या त्या नवरीचं वय १८ वर्ष असून भाच्याचं, नवरदेवाचं वय १९ वर्ष आहे.

सहा वर्षांपूर्वी आदित्य पटेल आपल्या मामाकडे एका लग्नात आला होता. त्यावेळी त्याचं नात्याने आत्या असणाऱ्या आंचल पटेलशी प्रेम झालं. एकमेकांनी त्यांचं एकमेकांवर प्रेम असल्याचं कबूल केलं. पण मुलगी नात्याने मुलाची आत्या लागत असल्याने, त्यांच्या कुटुंबाचा दोघांच्या लग्नाला विरोध होता परंतु जसं मुलीने वयाची १८ वर्ष पूर्ण केली, तसं तीन दिवसांनी तिने घरातून पळून मंगळवारी प्रियकराशी लग्न केलं. मुलगी घरात नसल्याने तिची शोधाशोध झाली. तिचे कुटुंबिय थेट मुलाच्या घरी पोहोचले. परंतु त्या दोघांच्या हट्टापुढे कुटुंबियांनी अखेर लग्नासाठी परवानगी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here