जळगावात कचराकुंडीत बाटल्यांमध्ये मानवी भ्रूण फेकल्याचा नागरिकांचा संशय?

जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : शहरातील तांबापुरालगत नॅशनल हायवे क्रमांक ६ ला लागून असलेल्या लाकडाच्या वखारीजवळ कचरा कुंडीत कमी दिवसांचे भ्रूण बाटलीमध्ये भरून फेकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कर्णोपकर्णी ही बातमी सर्वत्र पसरल्याने याठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

या घटनेची माहिती एम.आय.डी.सी. पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहचले असून, त्यांनी तपासास सुरुवात केली आहे. मात्र याबाबत शहरात चर्चा सुरु झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here