इचलकरंजी (महाराष्ट्र सह संपादक मनोज सोनवले) : ओरिसा, भुवनेश्वर येथे होणाऱ्या ज्युनिअर नॅशनल खो-खो स्पर्धेत कोल्हापूर विभागातून निवडण्यात येणाऱ्या संघनिवड खो-खो स्पर्धेचे उद्घाटन समारंभ डायनॅमिक स्पोर्ट्स क्लब, इचलकरंजी येथे संपन्न झाले.
या उद्घाटन समारंभात स्वप्निल आवाडे व गावभागचे नूतन पोलीस निरीक्षक राजूजी तहसीलदार यांनी उपस्थित राहून संघास पुढील खेळासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी राजन अरुणकर, शैलेश गोरे, भूषण शहा, संजय कुडचे, शेखर शहा, राहुल कुलकर्णी, भाऊ आडसुळ, गजानन होगाडे यांच्यासह क्रीडा मंडळ पदाधिकारी व पंच तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.






