जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : धरणगाव येथील पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांची बदली झाल्यानंतर नुकताच पदभार स्वीकारलेले वाशीम येथून आलेले पो.नी.शंकर शेळके यांचा, धरणगाव तालुका मराठा फॉउंडेशन चा वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मराठा फॉउंडेशन चे जिल्हा अध्यक्ष मा.पी.एम.पाटील सर यांनी परिचय करून दिला. पो.नी. शेळके नी ही कायद्याचा चौकटीत राहून सगळयांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी मराठा फौंडेशन चे जिल्हा अध्यक्ष पी.एम.पाटील सर,शहराध्यक्ष दिलीप जगन्नाथ पाटील,तालुका सचिव मंगेश पाटील सर,माजी उपनगराधक्ष प्रकाश पाटील,नगरसेवक नंदू पाटील,राहुल पाटील,समाधान पाटील,बुलंद पोलीस टाइम्सचे जिल्हा प्रतिनिधी योगेश पी. पाटील,भैय्या पाटील इ. समाज बांधव उपस्थित होते.






