ओबीसी राजकीय आरक्षण नियमित झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही

ओबीसी जनक्रांती परिषदेचा राज्य निवडणूक आयोगाला इशारा

मुंबई (महाराष्ट्र संपादक सुनिल पाटील) : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण नियमित झाल्याशिवाय राज्यात कुठल्याही निवडणुका आम्ही होऊ देणार नाही.ओबीसी जनक्रांती परिषद( महाराष्ट्र राज्य) संघटनेचा राज्य निवडणूक आयोगाला इशारा दिला आहे.

ओबीसी जनक्रांती परिषदचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ओबीसी नेते अनिलभाऊ महाजन यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांना एक पत्र लिहून राज्यात स्वराज्य संस्था मध्ये कोणत्याही निवडणुका आम्ही होऊ देणार नाही याबाबत इशारा दिला आहे.

obc-jankranti-nivedan

या पत्रात नमूद केले आहे की ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झालेले आहे ते जोपर्यंत नियमित सुरू होत नाही तोपर्यंत राज्यात कुठल्याही स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात येऊ नये असे या या पत्रात नमूद केले आहे. अठरापगड जाती, बारा बलुतेदार ओबीसी समाजावर हा खूप मोठा अन्याय आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचे तरुण राजकारणातून बाद होतील राज्यातील स्वराज्य संस्था नगरपालिका निवडणुकीच्या वार्ड रचना अधिसूचना राज्य सरकारने काढले आहे. त्यावर ओबीसी समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here