जळगाव (क्राइम रिपोर्टर असलम खान) : शहरातील परिसरात असलेल्या रामेश्वर कॉलनीतील तुळजाई नगरात एका महिलेचा गळा चिरून आणि चेहऱ्यावर जबरी हल्ला करून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला आहे. तुळजाई नगरात राहणाऱ्या वंदना गोरख पाटील वय-४२ या महिलेचा गळा आवळून आणि चेहऱ्यावर काहीतरी वस्तूने मारहाण करून खून करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला होता. या खूनामुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली.
दरम्यान या खुन प्रकरणाचा उलगडा लावण्यात एमआईडीसी पोलीसांच्या गुन्हे अन्वेशन विभागाला यश आले आहे. काही तासातच लागलेल्या या तपासामुळे पोलिस पथकाने सुस्कारा सोडला आहे. वंदनाचा पती मयत झाल्यानंतर तिचे सुरेश सुकलाल, महाजन याच्याशी प्रेम संबंध निर्माण झाले होते. सुरेश हा भाजीपाला मार्केटमध्ये हमालीचे काम करत होता ती त्याठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी येत होती दररोज दोघांची नजरानजर होत असल्यामुळे दोघे एकमेकांच्या संपर्कात आले. संपर्कातुन दोघात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. बघता सघता २१ वर्षाचा कालावधी लोटला दोघांचे प्रेम संबंध आता लपुन राहिले नव्हते. सुरेश विवाहित होता. तिचे त्याच्या घरी नेहमी येणे जाणे होते. दोघांचे प्रेमसंबंध त्याच्या घरात त्याची पत्नी व मुलांना माहिती झाले होते.

दरम्यान वंदनाचे कुणाशी तरी प्रेमसंबंध निर्माण झाल्याचा सुरेश याला संशय होता. या प्रकाराला त्याच्या विरोध होता. तिला कुणाशी तरी फोनवर बोलत असतांना सुरेश पकडले होते असा सुरेशचा आरोप आहे. मात्र तिने फोनवर- बोलवण्याचे नाव त्याला संगीतले नाही. सुरेश आपल्यासोबत असलेले संबंध संपुष्टात आणावे यासाठी ती त्याच्याशी व्यवस्थित; वागत नव्हती. ती त्याला अतिरिक्त पैशांची मागणी करत होते. गेल्या कित्येक वर्षापासून सुरेश तिचा सर्व खर्च पेलत होता. तसेच त्यांचे संबंध समाजात सर्वाना माहिती होते. असे असतांना तीने अन्य कुणासोबत प्रेमसंबंध असल्यास आपली सर्वत्र बदनामी होइल या विचारांने सुरेश अस्वस्थ झाला होता. या गोष्टीचा राग आल्याने संतापात त्याने मध्यरात्री वंदनाचा खुन केला आहे.
खुनाची घटना समजताच अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नी किरण बकाले यांनी घटनास्थळी धाव घेत; घटनेची माहिती एमआईडीसी पोलिसांचे पथक घटनास्थळी देखील हजर झाले होते. एमआईडीसी पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने संशयीत आरोपीचे नाव निष्पन्न केले होते. हा गुन्हा त्यानेच केला असल्याची खात्री झाल्यानंतर सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इमरान सैयद, मुदस्सर काझी, गोविंदा पाटिल, किशोर पाटिल, मुकेश पाटिल, सचिन पाटील, पुलिस चालक इतिहास खान, यांच्या पथकाने त्याला चोपडा येथुन ताब्यात घेतले. चोपडा येथुन जवळपास तिन कि.मी अंतरावर असलेल्या महादेव मंदिरात तो लपुन बसला होता. त्याचा शोध घेण्याकामी चोपडा येथील पोलिस मित्र मुख्तार शेख यांने पोलीस पथकाला तीन मोटरसाइकिल उपलब्ध करुन दिल्या त्यामुळे त्याला शिताफिने ताब्यात घेण्यासाठी पथकाला मोलाची मदत झाली. सुरवातीला त्याने वंदना कोण ? मी तिला ओळखत नाही अशी सुरुवात केली. मात्र लवकरच त्याने आपला गुन्हा कबुल केला. या गुन्हाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय शिंदे,सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, रतिलाल पवार, राजेंद्र कांडेकर, करत आहे. आरोपीस अटक करण्यात आली असुन उघा न्यायालयात हजर केले जाणार आहे.






