पी.एम.सी.माध्य.विद्यालयात यशाची परंपरा कायम; कु.मयुर कैलास गवळेचे NMMS परीक्षेत यश

शहादा (प्रतिनिधी सुशील गव्हाणे) : शहादा तालुक्यातील बामखेडा येथील पुष्पावती मदन चौधरी माध्यमिक विद्यालयाने दरवर्षी प्रमाणे यंदाही यशाची परंपरा कायम ठेवली आहे. इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेल्या कु मयूर गवळे ह्या विद्यार्थ्याने NMMS परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे घेण्यात आलेल्या NMMS अर्थात National Means Cum Merit Scholership Examination ह्या परीक्षेत सन 2020-21 ह्या शैक्षणिक वर्षातील परीक्षेत यशस्वी रित्या निवड झाली आहे. कोरोना काळातही शिक्षकांनी घेतलेल्या ऑनलाइन तासिका मुळे हे शक्य होऊ शकल्याचे कु.मयुर ह्याचे मत आहे. मयुर च्या या यशाची शालेय स्तरावर व परिसरातून विशेष कौतुक केले जात आहे.

माझ्या ह्या यशामागे माझ्या शाळेतील सर्व शिक्षकांचे विषेश योगदान आहे .कोरोना काळात ऑनलाइन पद्धतीने झालेल्या सर्व तासिकामुळे मी ही परीक्षा पास होऊ शकलो. सर्व शिक्षकांचे आभार
मयुर कैलास गवळे, इ.नववी

ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष श्री.जी.आय.पटेल,उपाध्यक्ष श्री. पी.बी.पटेल,सचिव श्री .बी.व्ही.चौधरी ह्यांनी मयुर च्या या यशाबद्दल खूप खुप शुभेच्छा देत त्याला भावी शैक्षणिक जीवनात अशीच प्रगती होत राहो आशा सदिच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक श्री.एस.एस.चौधरी सर व पर्यवेक्षक श्री .आर.एस. चौधरी सर यांचे कडून यशस्वी विद्यार्थ्याचे व शाळेतील सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here