मोटार सायकल चोरी व जबरी चोरी करणारे आरोपीत शांतीनगर पोलीस ठाणेकडुन जेरबंद

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : भिवंडी शांतीनगर परिसरात मोठया प्रमाणात मोटार सायकल चोरीच्या गुन्हयामध्ये वाढ होत असल्याने मा. पोलीस उपायुक्त श्री योगेश चव्हाण सो, परि. २ भिवंडी यांनी परिमंडळातील प्रत्येक पोलीस ठाणेतील अधिकारी व अंमलदार यांना आपआपले पोलीस ठाणे हददीत सतर्क गस्त करून वरिल गुन्हयांना प्रतिबंध व्हावा व असे गुन्हे उघडकीस आणुन असे गुन्हे करणारे गुन्हेगारांना वेळीच जेरबंद करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. प्रशांत ढोले सो, पुर्व विभग, भिवंडी, मा वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री शितल राउत शांतीनगर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे कारवाई केली आहे.

शांतीनगर पोलीस ठाणे हददीत तपास पथकाचे पोउपनिरी रविंद्र पाटील व अंमलदार यांनी गुप्त बातमीदारा मार्फत माहीती प्राप्त करून आरोपीत नामे १) फैजान मोहमद इस्लाम अंसारी वय १९ वर्षे रा. तलाहा यांची खोली, इरशाद | हॉटेलच्या मागे, खंडुपाडा, भिवंडी. २) कामीनअली अमजदअली बेग वय २० वर्षे रा आवेश बिल्डींग मोमीनपुरा खान कम्पाउड भिवंडी. यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे कौशल्यपुर्ण तपास करून मोटार सायकल चोरीचे ०७ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

शांतीनगर पोलीस पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी आरोपीत इसम नामे फैसल फिरोज अहमद असारी वय २१ वर्षे रा. घर नं. ५३८, कापतलाव धक्कयाजवळ, एकता हॉटेलचे समोर, मंगलबजार स्लॅब, भिवंडी यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन दोन जबरी चोरीचे गुन्हे व एक मोटार सायकलचा गुन्हा उघडकीस आणले आहे. _अश्या प्रकारे शांतीनगर पोलीस ठाणेचे मोटार सायकलचे एकुण ०६ व इतर पोलीस ठाणेचे ०२ तसेच जबरी चोरीचा शांतीनगर पो. ठाणे येथील ०१ व कोनगाव पो. ठाणे येथील ०१ असे एकुण १० गुन्हे घडकीस आणुन ३,६३,०००/- किमंतीचा मुदेमाल जप्त करून मुददमाल जप्त केला आहे. १) शांतीनगर पो.स्टे गु.र.क ५२३/२०२१ भादवि क ३७९ गुन्हयातील ४०,०००/- रू होंडा शाईन मो. सा MHDAHG5184 २) शांतीनगर पो.स्टे गु.र.क ४८५/२०२१ भादवि क ३७९ गुन्हयातील ३०.०००/- रू होंडा शाईन मो. सा MH04HP8525 ३) शांतीनगर पो.स्टे गु.र.क ५५३/२१ भादवि क ३७९ गुन्हयातील ४०,०००/- रू बजाज पल्सर मो.सा मो. सा. MHOSDD8097 ४) शांतीनगर पो.स्टे गु.र.क ५०५/२१ भादवि क ३७९ गुन्हयातील ६०,०००/- रू बजाज पल्सर मो.सा मो. सा. MHOAFT0947 ५) शांतीनगर पो.स्टे गु.र.क १४/२०२० भादवि क ३७९ गुन्हयातील ३०,०००/- रू होंडा डिलक्स मो.सा MH04HB6113 ६) भिवंडी शहर पो.स्टे गु.र.क २९९/२०२१ भादवि क ३७९ गुन्हयातील ५०,०००/- रू होंडा युनिकॉर्न मो.सा. MHOAKG9533 ७)मुंब्य पो.स्टे. गु.र.क ७७५/२०२१ भादवि क ३७९ गुन्हयातील ५०,००० रू बजाज पल्सर मो.सा चेसीस नंबरMDIABEXOLCE31043 ८) शांतीनगर पो.स्टे गु.र.क ५८५/२०२१ भादवि क ३७९ गुन्हयातील ४०,०००/- रू होंडा स्पेलंडर मो. सा इंजीन नंबर HA10AG5E04414 ९) शांतीनगर पो.स्टे गु.र.क ५८४/२०२१ भादवि क ३९२ गुन्हयातील ७,०००/-रू रेडमी कंपनीचा मोबाईल १०) कोनगाव पो.स्टे गु.र.क २२३/२०२१ भादवि क ३९२ गुन्हयातील १६,०००/-रू ओप्पो कंपनीचा मोबाईल.

सदरची कामगिरी शांतीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शितल राउत, पोलीस निरीक्षक (प्रशा) किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नितीन पाटील, पोलीस निरीक्षक विक्रम मोहीते, पोउपनिरी/रविंद्र पाटील, सपोउपनिरी/ भोला शेळके, पो.हवा / २७६० रविंद्र चौधरी, पो.ना/१८९९ तुषार वडे, पो.ना/१०५१ सुशिल इथापे, पो. ना/१८६५ रिजवान सैयद, पो.ना/२८८७ किरण मोहीते, पोना/६४६९ किरण जाधव, पो.ना/७००५ प्रसाद काकड, पो. ना/१७७२ श्रीकांत पाटील, पो.शि/१९९७ अमोल इंगळे, सर्व नेम शांतीनगर पो. स्टे. यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here