राज्य सरकार विरोधात भाजपा आक्रमक; भाजपातर्फे शिर्डीत सरकार विरोधात शंखनाद आंदोलन

शिर्डी (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी, शिर्डी शहराच्या वतीने श्री साईबाबा समाधी मंदिर व राज्यातील सर्व मंदिरे खुली करावी यासाठी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली शंखनाद आंदोलन करण्यात आले. राज्यातील बंद असलेली धार्मिक स्थळे पुन्हा सुरू करण्यासाठी भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने राज्यभर श्रीकृष्ण जयंती व चौथा श्रावण सोमवारच्या मुहुर्तावर सरकारला जाग येण्यासाठी राज्यभर शंखनाद आंदोलनाचे आयोजन केले होते.त्या अनुषंगाने शिर्डी येथे भारतीय जनता पार्टी, शिर्डी शहराच्या वतीने शंखनाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

सध्या राज्यात सत्तेत असलेले सगळे अतिशहाणे आहेत.राज्याचे मुख्यमंत्री कोविड महामारी आल्या पासुन बोटांवर मोजता येईल इतक्याच वेळेस घराच्या बाहेर आले आहेत. त्यांना सामान्य नागरिकांच्या आर्थिक परिस्थिती ची जाणीव नाही. मुख्यमंत्री स्वतः घरात बसुन आहेत.देवी-देवतांना बंदिस्त करुन मंदिरावर अवलंबून असलेल्या अनेक व्यावसायिकांची उपासमार करणाऱ्या ठाकरे सरकारचे फक्त सध्या वसुली वरच लक्ष आहे. तसेच भाविकांची अध्यात्मिक भावना आणि श्रद्धेचा विचार करता तात्काळ मंदिरे खुले करावी.अन्यथा या पेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन येत्या काळात करू असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी दिला.

आपले राज्य सोडुन देशातील इतर राज्यात सर्व धार्मिक स्थळे सुरू आहेत.पण मात्र आपल्या राज्यात सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत.राज्यातील सरकार हे अकार्यक्षम आहे.हे सरकार लवकर निर्णय घेत नाही.जर धार्मिक स्थळे उघडली तर अर्थचक्र सुरुळीत चालेल.असे शिर्डी नगरपंचायत चे नगराध्यक्ष श्री. शिवाजी गोंदकर यावेळी म्हणाले.

शिर्डी श्रीसाईबाबांच्या समाधी चे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येतात. व शिर्डी शहरासह परिसरातील अनेक जण भाविकांना सेवा देतात. यातुन अनेकांना रोजगार भेटतो हे रोजगार मारण्याचे काम हे सरकार करत आहे.कुंभकर्णी झोपलेल्या राज्य सरकारला जाग येण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी च्या वतीनं शंखनाद आंदोलन करण्यात आले आहे.या शंखनादानी या कुंभकर्णी झोपेतील सरकार जाग येईल असे भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष श्री. सचिन शिंदे या वेळी म्हणाले.

या आंदोलनात भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्रजी गोंदकर, तालुकाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर गोंदकर, नगराध्यक्ष श्री.शिवाजी भाऊ गोंदकर,शहराध्यक्ष श्री.सचिनजी शिंदे, युवा मोर्चा प्रदेश सदस्य श्री.किरण बोराडे, युवा मोर्चा चे शहराध्यक्ष श्री.योगेश अण्णा गोंदकर, मा.उपनगराध्यक्ष श्री.जनन्नाथ गोंदकर, श्री.मंगेशजी त्रिभुवन, श्री.दिपकजी वारुळे,श्री.रवींद्र तात्या गोंदकर, श्री.रविंद्र कोते, श्री.राजेंद्र हरिभाऊ गोंदकर , तुकाराम पा. गोंदकर, जिल्हा कोषाध्यक्ष श्री.रमेशराव बिडये,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री.राम आहेर, उत्तर भारतीय आघाडीचे जिल्हा संयोजक श्री. राजेश शर्मा, ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस श्री. सचिन भैरवकर, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष श्री स्वानंद रासने, श्री.सुधीर शिंदे, प्रसिद्धी प्रमुख श्री.पंडित गुडे,जिल्हा-सरचिटणीस श्री.नरेश सुराणा, सचिव श्री सोमराज कावळे, संघटन सरचिटणीस श्री.लखन बेलदार,योगेश वाकचौरे, सरचिटणीस योगेश वाकचौरे, उपाध्यक्ष श्री प्रसाद जी शेलार, अमोल बडे, सचिव-प्रशांत थोरात, गणेश सोनवणे, सतिश गायकवाड, विनोद गोंदकर,अक्षय मुळे, सोशल मीडिया प्रमुख सागर जाधव सोशल मीडिया सह प्रमुख विशाल जी पवार,सदस्य प्रविणजी भोईर, युवा वॉरियर शहराध्यक्ष सागर बेलदार,युवा वॉररियर्स उपाध्यक्ष सागर जी कुमठ आदी पदाधिकाऱ्यांसह, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here