जळगाव (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर निखिल ठाकूर) : येथे आज रिध्दी जान्हवी फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा सौ.चित्रलेखा मालपाणी यांचा वाढदिवस आज अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
वाढदिवस साजरा करत असतांना परंपरेला फाटा देत त्यांनी गरजू व गरीब गरजवंतांना कंबल वाटप केले.त्या वेळेस त्या गरजू व्यक्तींनी त्यांच्या जवळ त्यांच्या व्यथा पण मांडल्या त्या वेळेस त्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. कंबल वाटप हे रेल्वे स्टेशन,सिव्हिल हौस्पिटल व गोलाणी मंदिर येथे केली ह्या पुढे कोणाचाही वाढदिवस असेल तर त्यांनी रिकामा खर्च न करता अशी गरजवंतांना मदत करून त्यांच्या जीवनात काही क्षण आनंद निर्माण करावा या सारखा कोणताच आनंदी क्षण आपल्या जीवनात येणार नाही असे त्यांनी आपले विचार मांडले.
यावेळी त्यांनी सर्वांना असाच अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करावा अशी रिध्दी जान्हवी फाऊंडेशनच्या वतीने विनंती केली आहे.जे कोणी ह्या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिता त्यांनी रिध्दी जान्हवी फाऊंडेशन येथे संपर्क साधावा की गरजू गरजवंतांपर्यंत थेट मदत पोहचविण्यासाठी २४ तास ही संस्था मदत करीत राहील.






