अक्कलकोट (तालुका क्राईम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) : शनिवारी २८ ऑगस्ट रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अन्य काँग्रेस पदाधिकाऱी यांच्या सोलापुर जिल्हा परिषदेजवळील काँग्रेस भवनासमोरील पोष्टरवर काही अज्ञात समाटकंटकांनी शाईफेक करत दगडफेक केली. अशा गुन्हेगारांची त्वरीत शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी अक्कलकोट काँग्रेसने शासनाकडे केली आहे.
आज जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष अश्फाक बळोरगी यांच्या नेतृत्वाखाली सभापती प्रथमेश म्हेत्रे, सभापती आनंदराव सोनकांबळे यांच्या उपस्थितीत नायब तहसीलदार मिलींद कांबळे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जि.प. सदस्य मल्लीकार्जुन पाटील,माजी सभापती विलास गव्हाणे,नगरसेवक सद्दाम शेरीकर, विकास मोरे,चंदन अडवितोटे, अक्कलकोट युवक काँग्रेस ता अध्यक्ष बाबासाहेब पाटील शहर अध्यक्ष मुबारक कोरबु,माजी नगरसेवक सुनिल खवळे,शशिकांत भकरे,युवा नेते धर्मराज गुंजले,प्रविण शटगार,फारूख बबची,सुनिल ईसापुरे,महादेव चुंगी,हमिद गिलकी, गणेश अलोळी,राहुल भकरे,सिद्धाराम बिराजदार,सिद्धु म्हेत्रे,गुरू म्हेत्रे,सरफराज शेख राजु पाटोळे,पंडीत पवार,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.






