डहाणू तालुक्यात पूरस्थिती; ग्रामीण भागात घरांमध्ये पाणी शिरले

डहाणू (प्रतिनिधी) : डहाणूत रात्रीपासून पावसाचा तडाखा बसत असून मुसळधार पावसासह ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत सुरू आहे. यामुळे डहाणू तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

अनेक ठिकाणी सखल भागात पाणी पातळी वाढू लागली आहे. ग्रामीण भागात घरांमध्ये आणि शहरी भागातील गृहसंकुलात पुराचे पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे.

डहाणू शहरातील मुख्य रस्त्यांसह, डहाणू बोर्डी प्रमुख राज्य मार्गारून अनेक ठिकाणी पुराचे पाणी वाहू लागले आहे. नदी, नाले तुडुंब भरले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. घोलवड पोलिसांकडून नागरिकांना मदत पुरवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here