शेंदुर्णीत भाजपाच्या नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

जामनेर (प्रतिनिधी संजय सुयवंशी) : शेंदुर्णी येथील भाजपाचा विद्यमान नगरसेवक गणेश किसन पाटील यांच्या विरोधात पहूर पोलिस स्टेशनला फिर्यादी महिलेने विनयभंगाची तक्रार दिली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की ,येथील शेतकरी महिला त्याच्या मालखेडा शिवारातील शेतात उडदाच्या शेंगा तोडणी करण्यासाठी पतीने शेतात सोडून ,पती घरगुती कामासाठी गावात निघून गेले त्यावेळी गणेश पाटील हे पाणी पिण्यासाठी माठा जवळ आले मी त्यांना माठातून पिण्यासाठी पाणी दिले ,तद्नंतर शेंगा तोडणीस निघत असताना गणेश पाटील यांनी माझा हात धरला व लज्जा वाटेल अश्या नजरेने पाहून येथे बस म्हणू लागला, मी त्याच्या हाताला झटका देऊन तेथून निघून गेली,दुपारी पती व सासू शेतात आल्यावर घडलेला प्रकार त्यांना सांगितला तद्नंतर पतीने गणेश पाटील याला फोन करून विचारले तर नंतर बोलतो असे सांगून टाळले,असे फिर्यादीत म्हटले आहे, सदरची फिर्याद नोंद झाली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे

fir copy1

 

फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर नगरसेवक गणेश पाटील यांच्या पत्नीने फिर्यादी महिलेच्या पतीविरोधात विनयभंगाची तशीच तक्रार दिली आहे. सदर क्रॉसकंप्लेंट नोंदवून घेतलेने शेंदुर्णीत पोलिसांच्या विरोधात सूर उमटत आहे.

फिर्यादी महिलेच्या पतीने गणेश पाटील यांच्याशी सायंकाळपर्यंत संपर्क साधून असे का केले म्हणून विचारले , पोलिस चौकीत फिर्याद देण्यासाठी गेले असता अनेकांनी गणेश पाटील यांना बोलावून त्यांना माफी मागण्याची सांगितले, नगराध्यक्षपती अमृत बापू व अनेक नगरसेवकांनी त्यांना माफी मागून प्रकरण मिटवून घ्या असे सांगितले,असे फिर्यादी महिलेच्या पतीने सांगितले.

fir copy2

पोलीस चौकीवर फिर्याद देण्यासाठी गेलेल्या महिलेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, चौकीवर मनुष्यबळ कमी असल्याने फिर्याद घेण्यासाठी अनेक तास थांबावे लागले व तद्नंतर सामाजिक दबाव वाढल्याने पहूर ला पाठवण्यात आले. सदर महिलेने एक महिन्याच्या मुलीसह भर पावसात मोटर सायकलने पतीसह पोलीस स्टेशन गाठले व तेथे तक्रार देऊन गुन्हा नोंद करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here