बंगळुरू (कर्नाटक) : बंगळुरूच्या कोरमंगला येथे काल रात्री एका वेगवान ऑडी कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. वेगाने चालणाऱ्या ऑडी कारने एका इमारतीला धडक दिली आहे.
या अपघातात द्रमुक आमदाराचा मुलगा आणि सून यांचा मृत्यू झाला. एका अधिकाऱ्याने सांगितले की हा अपघात इतका भीषण होता की ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. एका व्यक्तीचा रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला.इतर मृतांमध्ये केरळमधील अक्षय गोयल, हरियाणा येथील उत्सव, रोहित, इशिता आणि हुबळी येथील डॉ. जानुष यांचा समावेश आहे. ही घटना दुपारी १.३० च्या सुमारास घडली, असे अधिकाऱ्याने सांगितले. चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या इमारतीत घुसली.
Karnataka: Seven people killed in a car accident in Koramangala area of Bengaluru in the wee hours of Tuesday, as per Adugodi Police Station pic.twitter.com/GTcob09pG4
— ANI (@ANI) August 31, 2021
या अपघातात तामिळनाडूच्या होसूर मतदार संघातील द्रमुक पक्षाचे आमदार वाय प्रकाश यांचा मुलगा आणि सून यांचा मृत्यू झाला आहे. आमदाराने स्वतः याची पुष्टी केली आणि सांगितले की मुलगा करुणा सागर आणि सून बिंदू यांचा मृत्यू झाला आहे.






