ठाणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रकाश कदम) : ठाणे महापालिका हद्दीतील माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने हल्ला केला. अवैध फेरीवाल्यांवर कारवाई सुरु असताना हा हल्ला करण्यात आला. त्यात त्यांची बोटे छाटली गेली आहेत.
या प्रकरणावरून पुन्हा एकदा राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचे पहायला मिळत असून, सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची प्रवीण दरेकर यांनी भेट घेऊन विचारपूस केली. राज्य सरकारने या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.






