बुरख्याचा गळाफास बसून पिंपरी येथे चिमुकलीचा मृत्यू

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : शहरातील रुपीनगर चिखली परिसरात एका घरात चिमुकली खेळत असताना बुरख्याचा गळफास बसल्याने आठ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही घटना रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली आहे. सुमैय्या सफिल शेख असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमय्याचे पालक नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. सुमैय्या मोठ्या बहिणींसोबत घरातच खेळत होती. सुमैय्या एका खोलीत आणि तिच्या बहिणी दुसऱ्या खोलीत होत्या. त्याचदरम्यान, बुरख्याचा झोपाळा केला असता तो खेळत असताना पाय निसटल्याने अचानक तिच्या गळ्याभोवती फास अडकला.

दुसऱ्या खोलीमध्ये असलेल्या बहिणींना काही कळायच्या आत सुमैय्याचा मृत्यू झाला. सुमैय्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून घोषित केले. शेख दाम्पत्यांना चार मुली असून सुमैय्या ही सर्वात लहान होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here