कोरोनाच्या या वातावरणात आरोग्य शिबिर घेऊन अजून कोरोना संपलेला नाही हे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने दाखवून दिले -जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग व ठाणे शहर यांच्यातर्फे ठाण्यात महा मोफत आरोग्य शिबिर संपन्न

ठाणे (विशेष प्रतिनिधा सुभाष शांताराम जैन) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष, ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक संजय भोकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंतराव मुंडे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, वृत्तवाहीनी प्रमुख रणधीर कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष राकेश टोळे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाने आणि कोकण विभाग व ठाणे शहर अध्यक्ष नितीन शिंदे यांच्या संकल्पनेतून कोरोना काळात आपली भुमिका बजावणारे ठाणे शहरातील पत्रकार व नागरिकांसाठी आरोग्य धनसंपदा फाउंडेशन तेरना स्पेशालिटी हाँस्पीटल अँड रिसर्च सेंटर, नेरूळ ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महा आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन गडकरी रंगायतन तालीम हाँल येथे 10 ते 2 यावेळेत करण्यात आले होते

यावेळी ठाण्यातील शासकीय राजकीय सामाजिक आणि पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ठाण्यातील पत्रकार व 200 ते 250 नागरिकांनी या मोफत शिबिरांचा लाभ घेतला नागरिकांनी आरोग्य तपासणी करून त्यांना असलेल्या आरोग्य विषयक शंकाचे निरसन तेरना हास्पीटलचे डाँ.जितेंद्र पाटील यांनी केले.

कार्यक्रमात ठाणे जिल्हाअधिकारी राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त ठा.म.पा. संदीप माळवी, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, संपादक जनादेश कैलाश म्हापदी, एम.सी.एच.आय.क्रेडाई -अध्यक्ष जितेंद्र मेहता, निर्माते दिग्दर्शक प्रविण तरडे, सरचिटणीस महाराष्ट्र काँग्रेस कमिटी मनोज शिंदे,अध्यक्ष इटंक काँग्रेस ठाणे सचिन शिंदे नगरसेविका ठा.म.पा. प्रतिभा मढवी, जिल्हा माहीती अधिकारी अजय जाधव, उपशहर अध्यक्ष मनसे ओवळा माजिवडा मंजुळा डाकी उपस्थित होते

त्याचबरोबर पत्रकार संघाचे पदाधिकारी कोकण विभागीय सचिव किशोर पाटील, पालघर अध्यक्ष विकास पाटील,ठाणे शहर सचिव मिलिंद दाभोळकर, सल्लागार प्रमोद घोलप, उपाध्यक्ष संजय भोईर, कार्याध्यक्ष अतुल तिवारी, संघटक मनोज कदम, संपर्क प्रमुख सतीश कुमार भावे,सहसचिव अमित जाधव, कल्याण संपर्क प्रमुख मिनल पवार, सहसंपर्क प्रमुख – प्रशांत मोटे, कार्यकारणी सदस्य अश्विन कांबळे,कार्यालयीन व्यवस्थापक अभिषेक चव्हाण, सह वुत्तवाहीनी प्रमुख संतोष पडवळ, प्रसिध्दी प्रमुख – देवेंद्र शिंदे, सुबोध कांबळे, अमित गुजर व इतर सदस्य – संजय ताबंडे, प्रसाद जावडे, राहूल लाड, राजेंद्र गोसावी, ख्वाजा शेख, पत्रकार, छायाचित्रकार सुभाष जैन,देवेंद्र वाईरकर, कार्यक्रम व्य़वस्थापक व न्यूज मराठी व तरूण आव्हान प्रतिनिधी पत्रकार मनस्वी चौधरी,पत्रकार पल्लवी होनखंडे, पत्रकार मनीष तळदेवकर, पत्रकार मनाली मोरे,पत्रकार वंशिका चाचे, समाधान अवताडे, अश्विनी भालेराव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here