महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे चिटणीस ॲड.प्रविण ठाकूर यांची माहिती.
अलिबाग (प्रतिनिधी संजय सावंत) : स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कोरोना महामारीच्या काळात इमानेइतबारे सेवा देणा-या आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचा-यांना सेवेतून अचानक कमी केले गेल्याने या कर्मचा-यांनी अलिबाग येथे आंदोलन सुरू केले आहे.
या पार्श्वभूमीवर या कर्मचा-यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र पाठवीणारे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे चिटणीस अॅड.प्रविण ठाकूर यांनी अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या कर्मचा-यांची भेट घेतली. तसेच आज झालेल्या शांतता समितीच्या बैठकीमध्ये समितीचे सदस्य म्हणून ॲड.प्रविण ठाकूर यांनी हा विषय विशेष बाब म्हणून उपस्थीत करून पालकमंत्री ना.अदितीताई तटकरे यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले.

या बैठकीला जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकीत्सक हे देखील उपस्थित होते. ॲड.प्रविण ठाकूर यांनी यावेळी या कंत्राटी कर्मचा-यांची जोरदारपणे बाजू मांडली. जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी या प्रकरणी निधी केंद्राकडून येत होता तो बंद झाल्याचे सांगितले. तसेच या कर्मचा-यांच्या सेवा सुरू ठेवण्याबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर केला असल्याचे सांगितले.

जिल्हा रुग्णालय रायगड अलिबाग कोरोना काळात झालेल्या कॉन्ट्रक्ट कर्मचाऱ्यांना सेवेत कायम रुजू करून घेण्यासाठी जिल्हा अधिकारी यांना सेवेतील कर्मचाऱ्यान सोबत जाऊन निवेदन दिले. तसेच या कर्मचारांची लोकांची व्यथा जाणून घेतल्या त्याच प्रमाणे त्याने संकट समयी कश्या प्रकारची काम केलीत हे सर्वा जनतेला माहीतच आहे तसेच आता होणाऱ्या भरती प्रक्रियेत त्यांना प्राधान्य मिळावे या साठी प्रयत्न करणार असल्याच सांगितले.
ॲड.ठाकूर यांच्या मागणीला इतर उपस्थीत सदस्यांनीही पाठींबा दर्शविला. यावेळी आमदार बाळाराम पाटील, जिल्हा शांतता समितीचे सदस्य ॲड.प्रविण ठाकूर, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, दत्ता ढवळे, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधिक्षक अशोक दुधे, अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, पनवेल महानगरपालीका आयुक्त गणेश देषमुख इ.उपस्थित होते.






