मुंबई (महाराष्ट्र संपादक सुनिल पाटील) : सोमवार दिनांक ३०/०८/२०२१ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांना गोपनीय माहितगारामार्फत स्वात्रिशिर बातमी मिळाली की, पालीप पोलीस स्टेशनच्या हद्दित शांतीनगर परिसरास एक इसम हा ब्राउन शुगर, चरस व गांजा या अंमली पदार्थाची बेकायदेशिररित्या विक्री करीत आहे.
मिळालेल्या बातमीची तात्काळ दखल घेत डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त (गुन्हे) व रामचंद्र देशमुख, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली छापा कारवाई केली असता, आरोपी नामे अब्दुला अल्लीमुल्ला चौधरी रा. नवजीवन, शांतीनगर पालीप ता.वसई जि. पालघर यास ताब्यात घेवू त्याचे कब्जामणे ) १,00,000/- रुपये किमतीचे २७ रॉम वजनाची ब्राउन शुगर, २) ४.८०,00/- रुपये किंमतीचे १६० ग्रॅम वजनाचा चरस, ३) ८७,५००/- रुपये किंमतीचा ३ किलो ५८५ पॉम वजनाचा गांजा व ४) सदर गुन्हयात वापरेली ३,२१,५००/- एवढी रोख रक्कम व मोबाईल फोन, बजन काटा असा एकुण १,४१,000/- रूपये किंमतीचा रोख रकमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईबाबत वालीय पोलीस स्टेशन येथे गुरनं १२९/२०२१ अंमली पदार्थ विरोधी फायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुटिल तपास सपोनि, श्रीमती. कोळी ह्या करीत आहे.
सदरची कारवाई डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त (गुन्हे) व रामचंद्र देशमुख, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. देविदास हंडोरे, सपोनि. विलास कुटे, सपोनि. श्रीमती तेजश्री शिंदे, पोहवा, धनाजी इंगरले, पोशि, ज्ञानेश्वर चव्हाण, विष्णुदेव घरचुडे, अजय यादव व ईश्वर पाटील मर्य नेमणूक-अंमली पदार्थ विरोधी का, मिरा-भाईंदर,वसई-विरार यांनी केली आहे.






