मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे निधन झालं आहे. वयाच्या ४० व्या वर्षी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्धार्थ शुक्लाची प्राणज्योत मालवली. मुंबईतील कूपर रुग्णालयाने त्याला मृत घोषित केलं आहे.
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने झोपण्याच्या आधी काही औषधे घेतली होती, पण त्यानंतर तो उठू शकला नाही. सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने पुष्टी केली आहे.
टीवी अभिनेता और बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्ला का निधन हो गया: मुंबई पुलिस
(फोटो सोर्स: सिद्धार्थ शुक्ला के ट्विटर अकाउंट से) pic.twitter.com/wfYhmC9iip
— ANI_HindiNews (@AHindinews) September 2, 2021
अभिनेता, होस्ट आणि मॉडेल आहे जो हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं काम करत होता. तो ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल ३’, ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. तो बिग बॉस 13 आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी ७ च्या रिअॅलिटी शोचा विजेता आहे. त्यानं सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले आहेत. त्याने डिसेंबर २००५ मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर ४० स्पर्धकांना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचं विजेतेपद पटकावले. २००८ च्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या शोमधील मुख्य भूमिकेतून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. २०१४ मध्ये, सिध्दार्थनं ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.






