घाटकोपर मानखुर्द उड्डाणपूल ठरतोय दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा

पालिकेच्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाने गमावला जीव

मुंबई (प्रतिनिधी फिरोज सिद्दिकी) : मागील काही दिवसांपासून नामांतराच्या वादात सापडलेल्या घाटकोपर – मानखुर्द उड्डाण पूल आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. मागील महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते घाटकोपर मानखुर्द उड्डाण पुलाचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी भूपृष्ठाचा काम चांगलं झाले नसल्याने नाराजी व्यक्त केली होती, तसेच पुलाच भूपृष्ठीकरन लवकरात लवकर करा अशा सूचना पालिकेला दिल्या होत्या. मात्र याकडे पालिकेने लक्ष दिल नाही.

पावसामुळे उडाणपुलावरील रस्त्याची दुर्दशा झाली असून या उड्डाणपुलाचे भूपृष्ठीकरन न झाल्याने पुन्हा एकदा एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. सोमवारी या रस्त्यावर ऑइल पसरल्याने अनेक दुचाकींचा अपघात झाले या अपघातांमध्ये मोहम्मद युसूफ खान या दुचाकी स्वाराला आपला जीव गमवावा लागला आहे तर याआधी देखील आरिफ साहा या दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला होता. एकंदरीतच हा उड्डाणपूल आता दुचाकी स्वारांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.

पालिकेच्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणानंतर पालिका प्रशासनाचे डोळे उघडले असून आता अतिरिक्त उपाययोजना करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र या अपघाताप्रकरणी उड्डाणपूल कंत्राटदारावर किंवा पलिका प्रशासनावर कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here