कौशल्य विकासात देशाला अग्रेसर बनविताना महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देईल – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचा शुभारंभ : राज्यातील विविध भागातील २६३ युवक-युवतींचा सहभाग

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : शांघाय (चीन) येथे पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक स्किल्स चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी राज्यात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कल्पक तरुणांना जागतिक पातळीवर त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त झाली आहे. कौशल्य विकासात देशाला अग्रेसर बनविताना महाराष्ट्र त्यात महत्वपूर्ण योगदान देईल, असे कौशल्य विकास मंत्री श्री. मलिक यांनी यावेळी सांगितले.

कुर्ला येथील डॉन बॉस्को आयटीआय येथे हा उद्घाटन सोहळा झाला. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, कौशल्य विकास विभागाच्या सहसचिव सुवर्णा खरात, तंत्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे सिनियर हेड जयकांत सिंह, डॉन बॉस्को संस्थेचे प्रशासक फादर मॅकएन्रो लोपेज आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ब्युटी थेरपी, कुकींग, सायबर सिक्युरीटी, ग्राफीक डिझाईन, हेअर ड्रेसिंग अशा विविध ४५ क्षेत्रातील कौशल्ये सहभागी राज्यातील युवक-युवतींमधील कौशल्य आणि नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत २० हजार ०९० उमेदवारांनी सहभाग घेतला होता. त्यातील जागतिक पातळीवर चांगली कामगिरी दाखवू शकतील अशा निवडक उत्कृष्ट २६३ युवक-युवतींची या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आता यातील उत्कृष्ट कामगिरी करणारे युवक-युवती पुढे राष्ट्रीय आणि जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. या युवक-युवतींनी विविध ४५ क्षेत्रातील कौशल्यावर चमकदार अशी कामगिरी दाखवली आहे.

इलेक्ट्रीकल इन्स्टॉलेशन, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, सीएनसी मिलिंग, सीएनसी टर्निंग, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन टेक्नॉलॉजी, हेल्थ आणि सोशल केअर, आयटी नेटवर्क केबल, मेकॅनिकल इंजिनिअरींग, प्लंबिंग आणि ॲम्प हिटींग, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग, वेल्डींग, ३ डी डीजीटल गेम आर्ट, ऑटोबॉडी रिपेअर, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, बेकरी, ब्युटी थेरपी, ब्रुकलेयींग, कॅबिनेट मेकींग, कार पेंटींग, कारपेन्ट्री, क्लाऊड कॉम्पुटींग, सीएनसी मिलींग, कॉन्क्रींट कन्स्ट्रक्शन वर्क, कुकींग, सायबर सिक्युरीटी, फ्लॉरिस्ट्री, ग्राफीक डिझाईन टेक्नोलॉजी, हेअर ड्रेसिंग, इंडस्ट्रीयल कंट्रोल, ज्वेलरी, जॉईनरी, लँडस्केप गार्डनिंग, मेकॅट्रॉनिक्स, प्लंबिंग, प्रिंट मेडीया टेक्नॉलॉजी, प्रोटोटाईप मॉडेलिंग, रेस्टॉरंट सर्व्हीस, वॉटर टेक्नॉलॉजी, वेब टेक्नॉलॉजी या सेक्टरमध्ये हे युवक-युवती आपले कौशल्य दाखवत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here