शिर्डी शहर व परिसरातील गुन्हेगारी समूळ नष्ट करणार – पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : शिर्डी व शिर्डी परिसरातील गुन्हेगारी नष्ट करून कायदा व सुव्यवस्था चांगल्या रितीने राबविणार व शिर्डी पोलिस स्टेशनचा नावलौकिक करणार असल्याचे नव्याने रूजू झालेले पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

नव्याने रूजू झाले म्हणून पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांचा सत्कार साईबांबाचे सेवक हाजी अब्दुलबांबाचे वंशज व मुस्लिम सेवा संघ तालुका अध्यक्ष गफ्फारखान पठाण,वसिम पठाण ईम्रान शेख नदीम पठाण यांचा कडुन.करण्यात आला व पुढील कार्यास हार्दीक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ते बोलत होते.

दिवसेंदिवस शिर्डी व शिर्डी परिसातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालल्यांने याकरिता शिर्डी पोलिस स्टेशनला कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक ची गरज होती.साईबांबानी सबका मालिक एक. सर्वधर्मसमभावाचे शिकवण लक्षात ठेवून कर्तबगारीने कार्य करीत साईबाबा नगरीत व परीसरात गुन्हेगारीचा बिमोड करतील अशी आशा व्यक्त करीत गफ्फारखान पठाण यांनी सांगितले .यावेळी उपस्थित सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक गधांले, सहाय्यक पोलिस निरीक्षक बारकु जाणे, उप पोलिस निरक्षक प्रविण दातरे, वैभव रुपवते सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here