बेपत्ता अल्पवयीन मुलीचा तात्काळ तपास लावणाऱ्या पीआय आधारसिंग सोनोने यांचा ब्रिक्स मानव अधिकार मिशन कारंजाच्या वतीने सत्कार

कारंजा (तालुका प्रतिनिधी हफीज खान) : शहरातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार मुलीच्या आई वडिलांनी कारंजा श.पो.स्टे ला दोन महिने आधी तक्रार दिली होती. त्या तक्रारीची एक प्रतीलीपी ब्रिक्स मानव अधिकार मिशन कारंजा यांनासुध्दा देण्यात आली होती.

अध्यक्ष पुनमताई बंग यांच्या नेतृत्वात कारंजा पो.स्टे ला यासंदर्भात निवेदन देण्यात आले त्या वेळी प्रभारी निरीक्षक होते. नुकत्याच काही दिवसापूर्वी रुजू झालेल्या कारंजा शहर पो.स्टे ला पो.निरीक्षक आधारसिंग सोनोने यांनी या तक्रारीची तात्काळ दखल घेवून ए.पी.आय.नम्रता जाधव व हेड कॉ.खोलेश्वर खुपसे,ना.पो.कॉ.अमोल कानडे,कॉ.रोहन तायडे,कॉ.पुजा काटे पो.कॉ.तायडे यांना मार्गदर्शन करून त्या अल्पवयीन मुलीला अवघ्या तीन दिवसात शोधुन काढले व आरोपीला जेरबंद केले. कारंजा शहरात कायदा व सुव्यस्था सुरळीत राहतील असे त्यांनी यावेळी सांगितले.

त्यांच्या जलद तपास व योग्य मार्गदर्शनाबद्दल ब्रिक्स मानव आधिकार मिशन जिल्हाच्या वतीने पो.निरीक्षक सोनोने यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विदर्भ महासचिव संदिप काळे,जिल्हाध्यक्ष राजेशसिंग ठाकूर,जिल्हाध्यक्ष व्यापारी सेल मोहन पंजवाणी,जि.महासचिव संतोष टेकाडे,शहर अध्यक्ष तेजपालसींग भाटीया,तालूका अध्यक्ष डॉ.अजय वाडेकर,माहिला अध्यक्ष पुनमताईव्यापारी अध्यक्ष प्रभाकर मुंगळकर,उपाध्यक्ष लूंबीनी बोर्डे , भारत हांडगे,सचिव प्रसाद देशमुख,रेवाळे ताई,. सदस्य डिके , विवेक गाडगे,यांची उपस्थिती होती .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here