मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : येथील एका इमारतीला भीषण आग लागली . ही इमारत वर्दळीच्या ठिकाणी आहे. घटनेची माहिती मिळताच जवळील अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. या घटनेत एक कर्मचारी जखमी झाला असून उपचारासाठी त्याला जवळील उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
बोरवली पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही आग बोरवलीमधील गजानन सोसायटीच्या ७ व्या मजल्यावर लागली आहे. आगीमुळे सोसायटीत राहणार्या सर्व लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. ही आग कशामुळे लागली याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. परंतु, स्वयंपाक खोलीत गॅस लिक झाल्यामुळे ही आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.






