पुणे (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक सदानंद काळे) : शनिवार ०४ /०९/ २०२१ पोलीस स्टेशन – वाकड वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाकडुन वाहन चोरी करणारा सराईत गुन्हेगारास अटक करुन १३ दुचाकी हस्तगत , एकुण १० वाहन चोरीचे गुन्हे उघड
मा . श्री . कृष्ण प्रकाश साो , पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड यांनी वाहनचोरी गुन्हयांना प्रतिबंध करून गुन्हे उघडकिस आणणेबाबत सुचना दिल्या . त्या अनुषंगाने डॉ विवेक मुगळीकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकाकील सपोनि श्री संतोष पाटील , सपोनि श्री अभीजीत जाधव व तपास पथकातील अंमलदार यांना वाहनचोरी गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या . त्या अनुषंगाने वाकड पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अंमलदार वंदु गिरे , राजेंद्र काळे , बाबाजान इनामदार , विभीषण कन्हेरकर असे
दि . २९ / ०८ / २०२१ रोजी वाकड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाहनचोरी गुन्हयांना प्रतिबंध करणेकमी वेगवेगळया मोटार सायकलीवरून पेट्रालिंग करीत होते . पोलीस अंमलदार वंदु गिरे व राजेंद्र काळे यांना काळाखडक झोपडपट्टी , मेन रोड , वाकड पुणे येथे एक इसम रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकींकडे संशयास्पदरित्या पाहत त्यांचे हॅन्डल लॉक चेक करीत असतांना दिसल्याने त्यास शिताफिने ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव शुभम बजरंग काळे वय २२ वर्षे रा . मु.पो. बोबडेवाडी , ता . केज , जि . बिड असे सांगितले . त्याला काळाखडक झोपडपट्टी परीसरात येण्याचे कारण विचारले असता त्याने उडावाउडवीची उत्तरे दिली . त्याचेकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता आरोपी याने पुणे व पिंपरी चिंचवड परीसरात दुचाकी वाहन चोरी केल्याची कबुली दिली . त्याने खालील १० गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे .
अटक आरोपी याचेकडुन तपासा दरम्यान वर नमुद वाहन चोरीचे गुन्हयातील चोरीला गेलेले १० दुचाकी व इतर ३ दुचाकी वाहने असा एकुण २,८०,०००/ – रु चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे . ३ दुचाकी बाबत अधिक तपास करीत आहोत . वरील जप्त दुचांकीपैकी काही दुचाकी आरोपीचे मुळगाव केज , जि . बिड येथून हस्तगत करण्यात आल्या आहेत .
सदरची कारवाई मा . श्री . कृष्णप्रकाश सो , पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , मा . डॉ . संजय शिंदे साो , अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड , मा . श्री . आनंद भोईटे साो , पोलीस उप आयुक्त , परि २. पिंपरी चिंचवड , मा . श्री . श्रीकांत दिसले , सहा . पोलीस आयुक्त सो , वाकड विभाग , पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली डॉ . विवेक मुगळीकर , वरिष्ठ पोलीस निरिक्षक , श्री . संतोष पाटील , पोलीस निरीक्षक गुन्हे , सपोनि श्री संतोष पाटील , सपोनि श्री . अभिजीत जाधव , पोलीस अंमलदार विभीषण कन्हेरकर , बाबाजान इनामदार , राजेंद्र काळे , बापु धुमाळ , नितीन ढोरजे , जावेद पठाण , विजय गंभीरे , विक्रम कुदळ , वंदु गिरे , प्रमोद कदम , अतिश जाधव , नितीन गेंगजे , प्रशांत गिलबीले , शाम बाबा , कल्पेश पाटील , तात्या शिंदे , कौन्तेय खराडे यांनी मिळुन केली आहे .






