अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणी पुढील सुनावणी १७ सप्टेंबरला

पनवेल (प्रतिनिधी विनया मेढेकर) : शुक्रवार (5 ऑगस्ट ) पनवेल न्यायालयात अश्विनी बेद्रे हत्याकांड खटल्यांमध्ये व्होडाफोनचे नोडल ऑफिसर गोडसे यांची साक्ष सुरू झाली पंरतु ती आज पुर्ण झाली नाही. त्यांची उर्वरित साक्ष पुढील सुनावणीस होणार आहे.

5 ऑगस्टच्या सुनावणीत बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर वापरत असलेले दोन्ही नंबर , माजी मंत्री एकनाथ खडसे याचा भाचा राजू उर्फ  ज्ञानदेव  पाटील वापरत असलेला मोबाईल नंबर आणि मयत एपीआय अश्विनी बिंद्रे वापरत असलेला नंबर असे एकूण चार मोबाईल नंबर व्होडाफोनचे होते आणि यांची सीडीआर, फोन कॉल डिटेल्स, जीपीआरएस लोकेशन याची माहिती पनवेल डीसीपी यांनी मागवली होती.   ही माहिती मीचं तयार केलेली आहे आणि त्यावर सही देखील माझीचं आहे,अशी साक्ष व्होडाफोन चे नोडल ऑफिसर गोडसे यांनी दिली.

गोडसे यांनी सांगितले कि, हे चार  मोबाईल घेतानाची ओरिजिनल कागदपत्रे कंपनीकडे आहे, ती  कागदपत्रे ते पुढील सुनावणीत हजर करणार आहेत . व्होडाफोन कंपनीचा मुख्य डाटा हा पुणे येथे आहे. पोलिसांना या चार ही मोबाईलचा डाटा , सीडीआर, फोन कॉल डिटेल्स आणि जीपीआरएस लोकेशन हे मार्च 2016 ते सप्टेंबर 2017 पर्यंतचे दिले आहे.

शुक्रवारी कोर्टात विशेष सरकारी वकील प्रदीप घरत , राजू गोरे ,एसीपी संगिता शिंदे-अल्फान्सो , आरोपी व आरोपीचे वकील हजर होते.पुढील सुनावणी १७ सप्टेंबर ला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here