शिर्डी (प्रतिनिधी तुषार महाजन) : सध्या कोविड-१९ च्या प्रादूर्भाव असल्याने कोणतेही सण-उत्सव हे गर्दी न करता साजरे केले जात असून नागरिकांनी कोरोनाचे नियमांचे पालन करावे. या धर्तीवर होऊ घातलेला गणेशोत्सव हा देखील नियमाचे पालन करून पर्यावरण गणेशोत्सव साजरा करावा, त्यासाठी तुरटीच्या गणेश मूर्ती हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन शिर्डीचे प्रांत गोविंद शिंदे यांनी शिर्डीत केले.
ते ग्रीन एन क्लीन शिर्डीच्या विद्यमाने प्रसाद वेद यांच्या अथक प्रयत्नाने शिर्डीकराणांसाठी तुरटीचा गणपती उपलब्ध करून देण्यात आले असून या स्टॉलचे उदघाटन प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, अध्यक्ष अजित पारख, डॉ.जितेंद्र शेळके, प्रसाद वेद, सौ.कृतिका वेद, ताराचंद कोते, अँड.अनिल शेजवळ, किशोर बोरावके, छोटुभाई भाटिया, तुकाराम गोंदकर, रघुनाथ गोंदकर, रजनीताई गोंदकर, अनुपमा गुजराथी, विनोद गोंदकर, रश्मी गोंदकर, डॉ. धनंजय जगताप, भारत चांदोरे, रविकिरण डाके, दादा काळे, नंदलाल मोटवाणी, गोपीनाथ गोंदकर, सागर वाल्हेकर, नितीन शिंदे, मयूर चोळके आदीसह मान्यवर उपस्थित होते. ग्रीन एन क्लीनच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. यंदाचा गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश भक्तांसाठी तीनशे किमी अंतरावरून शिर्डीकरांसाठी तुरटीचे गणपती उपलब्ध करण्यात आले आहे. हया समारंभानंतर बऱ्याच मुर्त्या ह्या नागरिकांनी आरक्षित केल्या आहे. ग्रीन एन क्लीनच्या या उपक्रमाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.






