नागपूरात केवळ ४५० रुपयांच्या उधारीवरून सराईत गुन्हेगाराचा खून

नागपूर (कार्यालय प्रतिनिधी) : नागपूरच्या पारडी भागात रविवारी झालेल्या काल्या डांगरेच्या हत्येचा उलगडा झाला आहे. उधारीचे ४५० रुपये परत न केल्याने गोट्या दुर्गुडे आणि पियुष पंचबुद्धे यांनी घरात घुसून त्याची हत्या केल्याचं कबूल केलं आहे. मयत काल्या डांगरे हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. तो पारडी परिसरात अवैध दारू विक्री करायचा.

काही दिवसांच्या पूर्वी काल्याने आरोपींकडून पैसे उसने घेतले होते. त्यातील 450 रुपये शिल्लक होते. त्यावरुन काल्या आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. त्याच वादातून धारदार शस्त्राने वार करत आरोपींनी काल्याची हत्या केली. या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here