भारती विद्यापीठ पोलिसांनी केली सराईत वाहन चोरास अटक; सात दुचाकी हस्तगत

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : भारती विद्यापीठ पोलिसांनी एका सराईत वाहन चोरास अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या दिड लाखाच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. गणेश बाळु ओतारी (२३, रा. मु. पो. शिवाजीनगर, ता. खंडाळा जि. सातारा) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दिनांक २३ सप्टेंबर रोजी अजय नथु धरपाळ (२७, धंदा दुध व्यवसाय, रा. अंजलीनगर, कात्रज) यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल लॉक करुन पार्क करुन ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेल्याने त्यांनी दिले तक्रारीवरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाचा तपास चालु असताना पोलीस अंमलदार अभिजीत जाधव यांना खबर मिळाली की, चोरीला गेलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल घेवुन एक मुलगा गुजरवाडी फाटा येथे ट्रकचे गॅरेज जवळ थांबलेला आहे. त्यानूसार सापळा रचून ओतारीला अटक करण्यात आली. अटक आरोपी हा सराईत वाहनचोर असुन त्याने आणखी काही गुन्हे केले आहेत का? याबाबत त्याचेकडे तपास करता त्याने आणखी गाडया चोरी केल्याचे कबुल करुन त्या विक्री करण्याचे हेतुने लपवुन ठेवल्याचे सांगुन गाडया लपवुन ठेवलेले ठिकाण दाखवुन तेथुन एकुण ६ दुचाकी गाडया काढुन दिल्या.

सदर गाडयांबाबत चौकशी करता सदर गाडया चोरीस गेले बाबत भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे २ गुन्हे, लोणंद पोलीस स्टेशन कडील १ गुन्हा, फलटन पोलीस स्टेशनकडील १ गुन्हा, चतुःश्रुंगी व कोथरुड पोलीस स्टेशन कडील १ असे ६ गुन्हे दाखल आहेत. यातील आरोपी याचेकडुन एकुण ७ दुचाकी गाडया जप्त एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुददेमाल हस्तगत करुन वाहनचोरी गुन्हे उघडकीस आणली आहे. सदरची कामगिरी उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक, संगिता यादव, विजय पुराणिक यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here