पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : दिनांक ६ सप्टेंबर रोजी तपास पथकांचे अधिकारी अंकुश कर्चे रात्रगस्त पेट्रोलिंग करीत असताना नारायणी धाम मंदीर जवळ एका नंबरप्लेट नसलेल्या दुचाकी गाडीवर आरोपी संशयीतरित्या बसलेले दिसुन आले. त्यांना पोलीस स्टाफने हटकताच ते पळून लागल्याने त्यांना पकडून कसून चौकशी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, त्यांच्या ताब्यातून एक एअरगन दोन पिस्तूले व चार काडतूसे हस्तगत करण्यात आली. सौरभ रामचंद्र सोळसकर(२२, बालाजीनगर, पुणे), शुभम आया कसबे (१९ कात्रज ), दत्तात्रय राजाराम पाटोळे (२१ रा. खोपडेनगर, कात्रज ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
यावेळी सौरभ सोळसकर यांचेकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व 2 काडतुसे, आरोपी शुभम कसबे यांचेकडे एक देशी बनावटीचा गावठी कट्टा व २ काडतुसे आणि आरोपी दत्तात्रय पाटोळे यांचेकडे एक काव्या रंगाची एअर गन अशी प्राणघातक हत्यारे व एक मोटार सायकल असा एकुण ८९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कामगिरी उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक, संगिता यादव, विजय पुराणिक यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे उप निरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार रविन्द्र भोसले, रविंद्र चिप्पा, गणेश सुतार, सचिन पवार, निलेश खोमणे, योगेश सूळ, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहुल तांबे, धनाजी धोत्रे, नवनाथ खताळ, सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, जगदीश खेडकर, शिवदत्त गायकवाड, राजु वेगरे, तुळशीराम टेंभुर्णे यांनी केली आहे.






