जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांची धुळे येथे बदली झाली आहे. बदलीचे आदेश प्राप्त झाले असून जळगावचाही अतिरिक्त कार्यभार राहणार आहे.
तसेच नंदुरबार जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे यांची पुणे येथे बदली झाली आहे. जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी धुळे येथे यापूर्वीही काम पाहिले आहे.






