डीकेटीईमध्ये एम्.टेक. इन डिफेन्स टेक्नॉलॉजी हा पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सुरुवात

अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) व उपाध्यक्ष आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

इचलकरंजी (महाराष्ट्र सहसंपादक मनोज सोनवले) : डीकेटीईमध्ये एम्.टेक. इन डिफेन्स टेक्नॉलॉजी हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी परवानगी मिळालेली आहे, या यशस्वी वाटचाली संदर्भात डीकेटीई, राजवाडा, इचलकरंजी येथे संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) व उपाध्यक्ष आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांची पत्रकार परिषद पार पडली.

भारत सरकारचे संरक्षण मंत्रालय, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डी.आर.डी.ओ.) व ए.आय.सी.टी.ई. नवी दिल्ली यांनी देशामधील २५ अग्रगण्य संस्थांमध्ये डीकेटीईचे निवड करुन डीकेटीई किंबहुना इचलकरंजीचा गौरव केला आहे ही अतिशय अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये मध्ये संशोधन व करिअर करु इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम म्हणजे एक सुवर्ण संधीच आहे. संपूर्ण भारतातून फक्त पंचवीसच इंजिनिअरींग कॉलेजसमध्ये हा अभ्यासक्रम सुरु होत असून,पश्‍चिम महाराष्ट्रामधून हा अभ्यासक्रम सुरु करणारे डीकेटीई हे एकमेव इंजिनिअरींग कॉलेज आहे,अशी माहिती डीकेटीईचे उपाध्यक्ष आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ichalkaranji-press-conferance

या पत्रकार परिषदेस सचिव डॉ.सौ.सपना आवाडे (वहिनी), संस्थेचे डायरेक्टर डॉ. पी.व्ही. कडोले (सर), प्रकाश मोरे, उपसंचालिका डॉ.सौ.एल.एस.आडमुठे, उपसंचालक डॉ.यु.जे.पाटील, विभागप्रमुख डॉ व्ही.आर. नाईक, डीन डॉ.आर.एन. पाटील यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here