कृषिरत्न देत आहे शेतकऱ्यांना विविध शेती विषयक योजनांची माहिती

कारंजा (तालुका प्रतिनिधी हफीज खान) : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय उमरखेड येथील अंतिम वर्षातील कृषिरत्न सत्यम हवा,ऋत्विक मोहोकार,विजय भेंडे यांनी 30 जुलै रोजी कारंजा (लाड) येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२१-२२ अंतर्गत भेट देऊन तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

या चर्चे दरम्यान सदर बँकेमध्ये असणाऱ्या ठेवी तसेच बँकेमधून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या योजना चा शेतकरी वर्गाला कशाप्रकारे फायदा होतो याविषयी सविस्तर माहिती घेण्यात आली. बँके मार्फत किसान क्रेडिट कार्ड स्कीम तसेच शेतकऱ्यांच्या पीक कर्जा विषयी माहिती जाणून घेतली, सोबतच बँके मार्फत उपलब्ध कृषि विषयक अनेक योजना जसे की प्रधान मंत्री पीक विमा योजना, बागायीतदर शेतकऱ्यांसाठी प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना, तसेच जे शेतकरी पशुपालन करतात त्यांच्या साठी पशुकिसान क्रेडिट कार्ड योजना ही योजना शेतकऱ्यांच्या पशूंची योग्य ती वाढ आणि विकास करण्याकरिता बँकेमार्फत आर्थिक सहकार्य देण्यात येते. तसेच शेतकऱ्याच्या हितासाठी असणाऱ्या इतर योजनांची ही माहिती घेण्यात आली.

सदर माहिती गावातील इतर शेतकऱ्यांपर्यंत या कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत पोहोचवण्यात आली, सदर प्रात्यक्षिकासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.के.चिंताले, कार्यक्रम अधिकारी प्रा.रवी सपकाळ सर विषयतज्ञ प्रा.अनिल इंगळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here