जळगाव (विशेष प्रतिनिधी मिलिंद वाणी) : बुधवारी जळगाव जिल्हा भारतीय मजदूर संघ च्या वतीने केंद्र व राज्य सरकार च्या महागाई च्या विरोधात निवेदन देण्यात अलीत व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी. भारतीय मजदुर संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रभाकर बाणासुरे, सुरेशचंद्र सोनार, एस झेड भावसार,भारतीय मजदुर संघाचे प्रदेश सचिव प्रवीण अमृतकर, जिल्हा अध्यक्ष पी जे पाटील, जिल्हा सचिव किरण पाटील, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे ज्ञानेश्वर पाटील, सचिन लाडवंजारी, बांधकाम मजदुर संघाचे सदाशिव सोनार, सत्यजित पाटील, आयुध निर्माणी कर्मचारी संघाचे सुहास विभांडीक, योगेश सूर्यवंशी, मजदुर संघाचे दिपक घोगरे, अनंत गडे, मच्छीमार संघाचे आत्माराम शिवदे, आयुर्विमा संघाचे अरुण जोशी व मोठ्या संख्येने मजदुर संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्र सरकारचे कामगार विरोधी धोरण, वाढती महागाई, पेट्रोल डिझेल व गॅसच्या गगनाला भिडलेल्या किंमती, मध्यमवर्गीय व गरिबांची होणारी पिळवणूक या अनुषंगाने महागाईवर ताबडतोब नियंत्रण आणून महागाई कमी करण्याची मागणी करण्यात आली त्याचबरोबर असंघटित असलेल्या बरा बलुतेदार असलेल्या व्यावसायिकांना रुपये दहा हजाराची मदत मिळावी यासाठीची मागणी करण्यात आली, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचेकडे देखील मुंबई परिसरातील सर्व सामान्य नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी मिळावी, पेट्रोल डिझेल गॅस यावरील कर कमी करण्यात यावा, गेल्या काही दिवसापासून महर्षत्रतील अनेक भागात अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत देण्यात यावी या साठीची मागणी करण्यात आली
आंदोलनाला सुरेशचंद्र सोनार, प्रभाकर बाणासुरे, प्रवीण अमृतकर, पी जे पाटील यांनी संबोधित केले सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






