चोपडा (प्रतिनिधी मिलिंद वाणी) : राज्यातील सामान्य मजूर कामगार महागाई ने त्रस्त झालेला असून पेट्रोल, डिझलला GST लावा व अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात आना, वस्तूवर उत्पादन मूल्य छापण्याचा कायदा करा ,बमंदिरे चालू करा, सर्व असंघटित कामगारांना 10 हजारांची मदत आदी मागन्या भारतीय मजदूर संघाच्या निवेदनात करण्यात आल्या.
महागाई च्या प्रश्नांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी ८ सप्टेंबर २०२१ रोजी राज्यभर निदर्शने करण्यात आली.पुणे, सातारा , सांगली , कोल्हापूर, नगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, ठाणे , पालघर , जळगाव , नांदेड, जालना, नाशिक आदी जिल्ह्याच्या ठिकाणी तर अनेक तालुक्यात आंदोलन करून पंतप्रधान व मुख्यमंत्री याना निवेदन देण्यात आले.
भारतीय मजदूर संघाच्या केंद्राच्या निर्णया नुसार संपुर्ण देशभर आंदोलन करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी राज्यशासनाने जमावबंदीचा आदेश दाखवून आंदोलन करण्यास मनाई केली , तर मुंबई पोलिसांनी आंदोलन करायचे असेल तर प्रत्येकी १५ हजाराचा जामीन आना असे सांगितले. सरकारच्या या हुकूमशाही चा निषेध करण्यात आला. सरकारने महागाई नियंत्रणात न आणल्यास राज्यभर रास्ता रोको आंदोलन करावं लागेल असा इशारा देण्यात आला. अशी माहिती प्रदेश अध्यक्ष ऍड अनिल ढुमणे व महामंत्री मोहन येनुरे यांनी दिली.






