ब्रह्मपुत्रा नदीत १०० लोकांनी भरलेली बोट उलटली; पहा थरकाप उडविणारा व्हिडीओ

दिसापूर (आसाम) : येथील ब्रम्हपुत्रा नदीत दोन बोटींचा भीषण अपघात झाला. या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही काळजाचा थरकाप उडेल. आसाममधील या घटनेनं सर्वांना हैराण करुन सोडलं आहे. या अपघातात अनेक लोक बेपत्ता देखील झाले आहे.

सुमारे १०० प्रवाशांना विरुद्ध दिशेने घेऊन जाणाऱ्या दोन बोटींची टक्कर झाल्याने आसाममध्ये खळबळ उडाली आहे. समोरुन बोट येताना दिसताच बोटीमधील नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. त्यानंतर टक्कर होताच अनेक प्रवाशी उडून थेट पाण्यात पडले. यामध्ये ५० पेक्षा जास्त प्रवाशी बेपत्ता झाले आहेत.

या अपघातात एक बोट आडवी झाली आहे. या अपघातात एकूण 43 जणांना वाचवण्यात यश आलं आहे तर एक मृतदेह देखील सापडला आहे. मात्र अजूनही काही लोक बेपत्ता आहेत. त्यांचा शोध देखील सुरु आहे. एखाद्या थरारक चित्रपटासारखा हा अपघात झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. तसेच तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आलं असल्याचं मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी म्हटलं आहे. या घटनेच्या व्हिडीओने सर्वांच्या आंगावर काटा आणला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here