खेड तालुक्यातही १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : खेड तालुक्यात पश्चिम भागातील एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६ जणांनी धमकावून दोन ते अडीच महिने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. याबाबत पिडित मुलीच्या आईने खेड पोलिस ठाण्यात ६ जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. तीन आरोपींना खेड पोलिसांनी अटक केली असून तीन फरार झाले आहेत.

पुण्यात मागील आठवड्यात पुणे स्टेशन, शिवाजीनगर आणि खडकी लॉज व इतर ठिकाणी नेऊन पीडित मुलीवर बलात्कार झाला होता पुण्यात ६ सप्टेंबरलाही लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. मित्राला भेटण्यासाठी मुंबई जात असलेल्या १४ वर्षाच्या मुलीला पुणे रेल्वे स्टेशनहून घरी सोडण्याचा बहाणा करुन रिक्षाचालकाने अपहरण करुन आपल्या मित्राच्या मदतीने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. पुण्यातील शिवाजीनगर, पुणे स्टेशन व खडकी परिसरातील लॉज व इतर ठिकाणी नेऊन पीडित मुलीवर बलात्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here