आज आढळले ३४५ कोरोनाबाधित; २२४ झाले कोरोनामुक्त
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब तपासणीचा आज (दि.४) मिळालेल्या अहवालानुसार ३४५ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर २२४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. २१७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. आज १५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने, आजवर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५६४ झाली आहे.
आज आढळून आलेल्या ३४५ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर ५०, जळगाव ग्रामीण ११, भुसावळ ९, अमळनेर ३१, चोपडा २२, पाचोरा ४४, भडगाव ७७, धरणगाव १७, यावल ३, जामनेर २९, रावेर ७, पारोळा १५, चाळीसगाव १४, मुक्ताईनगर १४ तर दुसऱ्या जिल्ह्यातील २ रुग्ण असा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.







