वाघूर धरण जलपूजनाचा मेहरुणच्या तांबे दाम्पत्याला दिला मान

महापौर सौ.जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांची प्रमुख उपस्थिती

जळगाव (महाराष्ट्र सहसंपादक तिलोत्तमदास बोंडे) : जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे २२ किलोमीटरवरील वाघूर धरण यंदा वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे मंगळवार, दि. ७ सप्टेंबर २०२१ रोजी १०० टक्के पूर्ण भरले. त्या अनुषंगाने हिंदू संस्कृतीची जपणूक करीत कृतज्ञता म्हणून आज गुरुवार, दि. ९ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसैनिक गजानन मालपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणस्थळी मेहरुणमधील रहिवासी युवराज तांबे व सौ.वंदना तांबे या दाम्पत्याला जलपूजनाचा मान देण्यात आला. त्यानंतर तांबे दाम्पत्याने सपत्नीक साडीचोळी, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून जलपूजन केले.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता व केमिस्ट श्यामकांत भांडारकर, विद्युत अभियंता विलास पाटील यावेळी उपस्थित होते.

jayshree-mahajan

 

waghur-dam

याप्रसंगी तांबे दाम्पत्यासह महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी वाघूर धरण असेच यापुढेही सदैव १०० टक्के भरून, या धरणाच्या पाण्यावर विसंबून असलेल्या जळगाव शहरासह जामनेर, भुसावळ तसेच अन्य परिसरातील गावांना लाभ मिळू द्यावा व सर्वत्र सुख-समृद्धी नांदावी, अशी आर्त आळवणी वरुणदेवताचरणी लीन होऊन केली. वाघूर धरणाचे बांधकाम १९७८ मध्ये झाल्यापासून आतापर्यंत ते तीन वेळा १०० टक्के भरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here