साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २४ तासांहून अधिक काळ पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर उपचार घेत असताना राजवाडी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

मुंबईच्या साकीनाका भागात एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्यानंतर प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड टाकण्यात आला होता. साकीनाका पोलिसांनी हा गुन्हा करणाऱ्या आरोपींविरोधात भादंविच्या कलम ३७६ आणि ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच मोहन चौहान अशा नावाच्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. संपूर्ण घटना या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. बलात्कारानंतर, आरोपीने पीडितेला अमानुषपणे मारहाण केली आणि नंतर फरार झाले. पीडितेला एका टेम्पोमध्ये फेकण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here