पिंपरीत निवृत्त एसीपी असल्याची धमकी देत शिक्षिकेवर बलात्कार

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : ‘’मी रिटायर एसीपी आहे, तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, अशी धमकी देत एकाने शिक्षिकेवर बलात्कार केला. हा प्रकार डिसेंबर २०१९ ते ८ ऑगस्ट २०२१ या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला. विकास अवस्ती (रा. पिंपळे गुरव), असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने शुक्रवारी (दि. १०) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शिक्षिका म्हणून नोकरी करीत असताना तिला पैशांची अडचण होती. त्यामुळे त्यांनी आरोपी विकास अवस्ती याच्याकडे पैशांची मागणी केली. दरमहा १० टक्के व्याजाने पैसे देतो, असे म्हणून आरोपीने फिर्यादी महिलेकडून दोन कोऱ्या धनादेशांवर सह्या घेतल्या.त्यानंतर फिर्यादीला शितपेय देऊन जबरस्तीने लैंगिक अत्याचार केले. तसेच विवस्त्र अवस्थेतील फोटो काढले. तसेच तिला पैसेही दिले नाहीत.

त्यानंतर अवस्थी हा संबधित महिलेल्याच्या शाळेत जाऊन तिला सोबत चलण्याचा आग्रह केला. मात्र, तिने नकार देताच ‘तू जर सोबत आली नाहीस तर विवस्त्र अवस्थेतील फोटो शाळेत आणि तुझ्या घरच्यांना दाखवून तुझी बदनामी करतो,’ अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी हा फिर्यादीला दुचाकीवरून बसवून घेऊन गेला. फिर्यादीने प्रतिकार केला. ‘तू जर ओरडलीस तर , तू जर कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकेन, मी रिटायर एसीपी आहे, माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही,’ अशी धमकी देऊन आरोपीने जबरदस्तीने शिक्षिकेवर बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

अत्याचार प्रकरणानंतर आणि अवस्ती देत असलेला त्रास पाहून महिलेने सांगवी पोलिस ठाणे गाठत त्याच्या विरोधात तक्रार दिली आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here