सार्थक मिसाळ गँग विरोधात ‘मोक्का’ : भारती विद्यापीठ पोलीस हद्दीतील दहशत मोडीत निघणार : वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर

पुणे (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक सुनिल पाटील) : भारती विद्यापीठ पोलीस हद्दीत गेल्या दोन वर्षांपासून दहशतीचे तांडव माजवणार्‍या सार्थक मिसाळ गँग विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त डॉ.अमिताभ गुप्ता यांच्या कारकिर्दीतील हा ५३ वा मोक्का आहे.

सार्थक संगीत मिसाळ टोळीवर सन २०२० पासून संघटीतपणे गंभीर स्वरूपाचे शरिराविरूद्धचे व मालमत्तेविरूद्ध गुन्हे दाखल आहेत. टोळीचे दशहत कायम राखण्यासाठी जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, दरोडा, अपहरण, बेकायदेशीर घातक शस्त्रे जवळ बाळगणे, दहशत माजविणे अशी कृत्ये सातत्याने परिसरात सुरूच होती. याबाबत पोलिसांनी टोळीतील अनेकांवर हद्दपार व स्थानबद्धतेची कारवाई केली होती परंतू त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसलेने त्यांचेवर कडक कारवाई आवश्यक होती. त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी मोक्का अंतर्गत कारवाई होणेसाठी अहवाल सादर केला होता. त्यास मंजुरी देण्यात आली

यावेळी आरोपी टोळीचा म्होरक्या १) सार्थक संगीत मिसाळ व २) अजय उर्फ शुभम रविंद्र हिरे ३) तुकाराम रामचंद्र येनपुरे ४) तुषार प्रकाश डोंबे ५) लकी उर्फ लखन अरुण गायकवाड ६) तेजस उर्फ बंटी तुकाराम येनपुरे ७) आदित्य उर्फ बबलू जगमोहन सिन्हा ८) कल्पेश अनिल चव्हाण यांच्यावर कारवाई झाली आहे. सदर मोक्का गुन्ह्याचा तपास सहा.पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण स्वारगेट विभाग यांच्याकडे देण्यात आला आहे.

सदर कारवाई डॉ.अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त, डॉ.रविंद्र शिसवे सहआयुक्त, राजेंद्र डहाळे अपर आयुक्त, सागर पाटील उपायुक्त-२, श्रीनिवास घाडगे उपायुक्त, सुषमा चव्हाण सहा.पो.आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखली जगन्नाथ कळसकर वपोनि, संगीता यादव (गुन्हे), विजय पुराणिक (गुन्हे), गंगाधर घावटे सहापोनि, पो.अंमलदार कृष्णा बढे, चंद्रकांत माने, महेश बारवकर, निलेश ढमढेरे व अमित शेडगे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here