मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या आनंदात हा सण साजरा केला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच राजकीय नेत्यांच्या घरी लाडक्या बाप्पा विराजमान झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बाप्पाच्या दर्शनासाठी वर्षा निवासस्थानावर दाखल झाले.
शरद पवार यांनी आज सहकुटुंब वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, सदानंद सुळे हे देखील उपस्थित होते.
Mumbai: NCP chief Sharad Pawar, his wife Pratibha Pawar, their daughter and MP Supriya Sule, and her husband Sadanand Sule visited 'Varsha' bungalow – Maharashtra CM Uddhav Thackeray's official residence for the 'darshan' of Lord Ganesh. pic.twitter.com/arHoJq6CF7
— ANI (@ANI) September 11, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानीही गणपती बाप्पा विराजमान झाले आहे. जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केली आहे. कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.






