सौ.अपर्णा अमोल गुंड सन २०२१ सालचा रायगड जिल्हा शिवभूमी आदर्श शिक्षिका पुरस्कारने सन्मानित

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) : अलिबाग-बेलोशी येथील परंतु नोकरी निमित्त पनवेल येथे कार्यरत असलेल्या सौ.अपर्णा अमोल गुंड यांचा प्राथमिक शिक्षिका शाळा वाघाची वाडी यांना सन २०२१ सालचा रायगड जिल्हा *शिवभूमी आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाला.

त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल माझेरी आगरी समाज अध्यक्ष ,माजी जिल्हा परिषद सदस्य,माजी पंचायत समिती अध्यक्ष माननीय बाळाशेठ तेलगे यांनी‌‌ सत्कार केला.

यावेळी जेष्ठ नागरी अध्यक्ष सुभाष वारगे,ओबीसी सेल अध्यक्ष अशोक वारगे, नरेश गुंड, अमोल गुंड उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्वांनी सौ.अपर्णा गुंड यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here