पुणे (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक सदानंद काळे) : दुचाकी चोरीच्या घटना रोखण्यासाठी सराईतांचा माग काढून त्यांना जेरबंद करण्यासाठी पोलीस प्रशासन ‘अलर्ट’ झाले आहे. हडपसर येथे एका सराईताला शिफातीने अटक करुन त्याच्याकडून तब्बल ११ दुचाकी हस्तगत करण्यात हडपसर पोलीसांना मोठे यश आले आहे.
हडपसर येथील पोलीस अंमलदार प्रशंात टोणपे, शाहिद शेख, रियाज शेख, यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम लाल काळ्या रंगाची हिरो होंडा पॅशन प्लस चोरीची दुचाकी गाडी घेवून ग्लायडिंग सेंटर जवळ, तुकाई दर्शन पायथ्यालगत भेकराईनगर याठिकाणी थांबलेला आहे. यावेळी वपोनि श्री. बाळकृष्ण कदम यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. बातमीप्रमाणे वर्णनाचा इसम सदर याठिकाणी गाडीवर बसलेला मिळुन आला. त्यास स्टाफचे मदतीने पकडून, ताब्यात घेवून, सदर इसमास त्याचे नाव पत्ता विचाले असता त्याने आपले नाव यशदिप गोविंद कोंडार वय २२ वर्षे, राहणार शिवशक्ती चौक, गंगानगर, गुरुदत्त कॉलनी, लेन नंबर-८, फ्लॅट नंबर-७, तिसरा मजला, भेकराईनगर, हडपसर, पुणे मुळ राहणार चाळ नंबर-१०, त्रिसंगम सोसायटी, नंदादिपनगर, मृणाली रोड, चक्की नाका, कल्याण ईस्ट ठाणे असे असल्याचे सांगितले. सदर इसमाकडे त्याचे ताब्यात मिळुन आलेल्या दुचाकी गाडीचे कागदपत्राबाबत विचारले असता, तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला, सदर गाडीचे इंजिन नंबर व चॅसिज नंबर वरुन गाडीची पडताळणी करता, सदरील गाडीचा मुळ आर.टी.ओ. क्रमांक- एमएच१२ ईसी-८९७८ असा असल्याचे व सदरील गाडी चोरीबाबत हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं.७३५/२०२१ भा.द.वि. कलम- ३७९ अन्वये गुन्हा नोंद असल्याचे निष्पन्न झाल्याने, सदर आरोपीचे ताब्यात मिळुन आलेली दुचाकी गाडी, जप्त करण्यात आलेली आहे. सदर आरोपीकडे अधिक तपास करता त्याचेकडे विविध पोलीस स्टेशनकडील खालील गुन्हे उघडकीस आले.
यावेळी गुन्हयामधील वाहने जप्त करण्यात आलेले आहे. १) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं.७३५/२०२१ भा.द.वि. कलम- ३७९, २) हडपसर पोलीस स्टेशन गुरनं- ७२६/२०२१ भादविक ३७९ , ३) हडपसर पोलीस स्टेशन गुरनं- ७३८/२०२१ भादविक ३७९, ४) हडपसर पोलीस स्टेशन गुरनं- ७२५/२०२१ भादविक ३७९, ५) हडपसर पोलीस स्टेशन गुरनं- ६४१/२०२१ भादविक ३७९, ६) चंदननगर पोलीस स्टेशन गुरनं- २५९/२०२१ भादविक ३७९, ७) बंडगार्डन पोलीस स्टेशन गुरनं- ०९/२०२० भादविक ३७९, ८) बंडगार्डन पोलीस स्टेशन गुरनं- ३१४/२०१८ भादविक ३७९, ९) विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गुरनं- १४१/२०२१ भादविक ३७९ वरील प्रमाणे ०९ वाहन चोरीचे गुन्हे उघड झाले असुन त्यांच्या ताब्यातून एकुण ०९ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असुन असा एकुण ४,००.०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.व इतर दोन मोटार सायकलचा मालकांचा शेाध घेण्याचे काम सुरु आहे.
सदरची कामगिरी ही मा.श्री.नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व नम्रता पाटील, पोलीस उप आयुक्त,परिमंडळ ५ पुणे शहर, यांचे सुचना व मागदर्शनाखाली कल्याणराव विधाते, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, राजु अडागळे, पोनि.(गुन्हे) दिगबंर शिंदे पोनि (गुन्हे) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सौरभ माने, पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे, गणेश क्षिरसागर, पोलीस नाईक अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, शशिकांत नाळे, सचिन जाधव पोलीस शिपाई शाहीद शेख, रियाज शेख, प्रशांत टाणपे, प्रशांत दुधाळ, निखील पवार,सचिन गोरखे,सुरज कुंभार यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.






