तिरुवन्नामलाई (तमिळनाडू) : येथील एका एका सेव्हन स्टारमध्ये बिर्याणी खाल्ल्यानंतर एका १० वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही बिर्याणी खाल्ल्यानंतर तब्बल २६ जणांना मळमळ आणि उलटीचा त्रास झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तिरुवन्नामलाईमध्ये एका सेव्हन स्टार हॉटेलमध्ये आनंद आणि प्रियदर्शनी हे दाम्पत्य लोशीनी आणि सरन आपल्या दोन मुलांसह जेवायला गेले होते. चौघांनी तिथे बिर्याणी खाल्ली. बिर्याणी खाल्ल्यानंतर चौघांना उलटी आणि मळमळ झाली. लोशीनीला तत्काळ एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
याच हॉटेलमध्ये बिर्याणी खाल्ल्यानंतर २६ जणांना जेवणातून विषबाधा झाली. जेवल्यानंतर त्यांना उलटी आणि मळमळ झाली. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर हॉटेल सील करण्यात आले असून हॉटेल मालकाला अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे.






