जळगाव (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : स्वर्गीय किसन नाले स्मरणार्थ ॲडव्हान्स आय केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये मोफत नेत्ररोग तपासणी डॉ,राहुल महाजन यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात महापौर जयश्री ताई व उपस्थितांनी श्री गणेश उत्सवाची आरती करून केली यावेळी महापौर सौ. जयश्री ताई महाजन यांच्या शुभहस्ते सुनिल दाभाडे यांचा महापौर कडून सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलतांना महापौर जयश्रीताई सोनवणे म्हणाल्या की, सुनिल दाभाडे हे जळगांवचे भूषण आहे. उपक्रमशील शिक्षक म्हणून सरांचा आम्हाला अभिमान वाटतो. सुनिल दाभाडे सरांनी GUINNESS WORLD RECORDS केल्याबद्दल खुप खुप अभिनंदन.त्यांनी कोरोना काळात अनेक गरजू लोकांना मदत केली आहे. तसेच कोरोना विषयी जनजागृती केली आहे.

त्याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, एस एस एस (SSS) स्पर्धा परीक्षा मागदर्शन केंद्र जळगांव, शिरसोली, नेरीचे संचालक व मार्गदर्शक सुनिल डी. सोनवणे, ॲडवोकेट हेमंत दाभाडे, शक्तीभाऊ महाजन, ललित धांडे, गणेश नाले, कलाशिक्षक सुनील दाभाडे, हर्षाली पाटील, करण राठोड, अंकिता शिंपी, ईश्वर कोळी, राहुल कोळी, गायत्री ठाकरे, सचिन दादा सैंदाणे, प्रकाश सपकाळ, रेड प्लस सोसायटीचे भरत गायकवाड, उपस्थित होते यावेळी एस एस एस स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक मार्गदर्शक सुनिल सोनवणे यांनी प्रास्ताविक वसंपूर्ण सूत्रसंचालन केले.






